नहेम्याह १०:३०
आजूबाजूच्या संदर्भासह वचन ३० दाखवत आहे.
२७
मल्लूख, हारीम व बाअनाह.
२८
“बाकी सर्व—याजक, लेवी, द्वारपाल, संगीतकार, मंदिराचे सेवक आणि बाकीचे इतर सर्व, ज्यांनी आपल्या पत्नी व सज्ञान पुत्र व कन्या यांच्यासह, परमेश्वराच्या नियमासाठी स्वतःला सभोवतीच्या लोकांपासून वेगळे केले होते—
२९
त्यांच्या सहकारी इस्राएली म्हणजे सरदारांसोबत एकत्र आले व त्यांनी परमेश्वराचा सेवक मोशेद्वारे मिळालेले परमेश्वराचे नियम अनुसरण्याची व याहवेह आमच्या प्रभूच्या आज्ञा, आदेश व कायदे काळजीपूर्वकरित्या पाळण्याची शपथ घेतली आणि पाळल्या नाहीत तर परमेश्वराचा श्राप स्वतःवर बंधनकारक केला.
३०
“आम्ही असेही वचन देतो की आम्ही आमच्या कन्यांना यहूदीतर पुरुषांशी व पुत्रांना यहूदीतर कन्यांशी विवाह करू देणार नाही.
३१
“शेजारील देशात असणार्या लोकांनी विक्रीसाठी धान्य किंवा इतर उत्पन्न आणले, तर शब्बाथ दिवशी किंवा इतर पवित्र दिवशी आम्ही ते विकत घेणार नाही. दर सातव्या वर्षी शेतात कोणतेही पीक न घेण्याचे आम्ही मान्य केले आणि सर्व कर्ज प्रत्येक सातव्या वर्षी माफ करू.
३२
“प्रत्येक वर्षी परमेश्वराच्या भवनाच्या सेवेकरिता: प्रत्येकी एक शेकेलचा तिसरा भाग चांदी देण्याची आज्ञा पाळण्याची;
३३
समक्षतेची खास भाकर; नियमित धान्यार्पणे व होमार्पणे; शब्बाथासाठी अर्पणे, अमावस्येचा सण आणि ठराविक सण; पवित्र अर्पणे; इस्राएलच्या प्रायश्चित्तविधीसाठी पापार्पणे; आणि परमेश्वराच्या भवनाची सेवा करण्याची जबाबदारीही आम्ही स्वीकारली.
Settings