Skip to content
नहूम ३:११-१७

निनवेच्या संरक्षणाची व्यर्थता

नहूम ३:११-१७
११
तू देखील मद्यपीप्रमाणे धुंद होशील; तू लपून बसशील आणि सुरक्षिततेसाठी तुझ्या शत्रूपासून आश्रय शोधशील.
१२
तुझे सर्व गड अंजिरांच्या झाडासारखे होतील त्यांच्या प्रथम पिकलेल्या फळांगत; जेव्हा ते हलविले जातात, तेव्हा ते नेमके खाणाऱ्याच्या तोंडात पडतात.
१३
तुझ्या सैन्य-दलांकडे पाहा— ते सर्व दुर्बल आहेत. तुझ्या देशाच्या वेशी तुझ्या शत्रूंसाठी सताड उघडलेल्या आहेत; तुझ्या वेशीच्या सळया अग्नीने भस्म केल्या आहेत.
१४
तुला पडणार्‍या वेढ्यासाठी पाण्याचा साठा करून ठेव, तुझे किल्ले मजबूत कर! चिखल तुडवून ठेव, चिखलाचा गारा साच्यांत भर, वीटकाम दुरुस्त कर!
१५
तिथे तुला अग्नी भस्म करेल; तलवार तुला कापून टाकेल— एखाद्या टोळधाडीप्रमाणे ते तुला गिळंकृत करतील. नाकतोड्यासारखे बहुगुणित व्हा, टोळांसारखे बहुगुणित व्हा!
१६
तू तुझ्या व्यापार्‍यांची संख्या वाढविली आहे त्यांची संख्या आकाशातील तार्‍यांपेक्षाही जास्त वाढली आहे, परंतु ते एखाद्या टोळधाडीप्रमाणे संपूर्ण भूमी ओरबाडून टाकतात व मग ते उडून जातात.
१७
तुझे रक्षक टोळांसारखे आहेत, तुझे अधिकारी टोळांच्या झुंडीप्रमाणे आहेत थंडीच्या दिवसात ते भिंतीमध्ये वसतात— पण सूर्योदय होताच उडून जातात, आणि कुठे जातात ते कोणालाच कळत नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options