नहूम ३:१०-१३
१०
असे असूनही थीब्जचा पाडाव झाला आणि तिला बंदिवासात नेण्यात आले. तिची बालके रस्त्यांच्या प्रत्येक कोपऱ्यावर दगडांवर आपटून ठार मारण्यात आली. तिच्या अधिकार्यांसाठी चिठ्ठ्या टाकण्यात आल्या, तिच्या सर्व प्रतिष्ठित व्यक्तींना साखळदंडानी बांधण्यात आले.
११
तू देखील मद्यपीप्रमाणे धुंद होशील; तू लपून बसशील आणि सुरक्षिततेसाठी तुझ्या शत्रूपासून आश्रय शोधशील.
१२
तुझे सर्व गड अंजिरांच्या झाडासारखे होतील त्यांच्या प्रथम पिकलेल्या फळांगत; जेव्हा ते हलविले जातात, तेव्हा ते नेमके खाणाऱ्याच्या तोंडात पडतात.
१३
तुझ्या सैन्य-दलांकडे पाहा— ते सर्व दुर्बल आहेत. तुझ्या देशाच्या वेशी तुझ्या शत्रूंसाठी सताड उघडलेल्या आहेत; तुझ्या वेशीच्या सळया अग्नीने भस्म केल्या आहेत.
Settings