Skip to content
मत्तय २७:१७-२०

मत्तय २७:१७-२०

१७
त्या ठिकाणी लोकांची खूप गर्दी जमली असताना, पिलाताने लोकांना विचारले, “सणानिमित्त मी तुमच्यासाठी कोणाला सोडून देऊ? येशू बरब्बास किंवा ख्रिस्त म्हटलेल्या येशूंना?”
१८
कारण पिलाताला कळले होते की, लोकांनी स्वतःच्या हितासाठी येशूंना धरून दिले होते.
१९
त्याचवेळी, पिलात न्यायासनावर बसला असतानाच त्याच्या पत्नीने त्याला निरोप पाठविला, “त्या निर्दोष माणसाच्या विरुद्ध जाऊ नका, कारण आज स्वप्नात मी त्याच्यामुळे फार दुःख भोगले आहे.”
२०
परंतु तोपर्यंत प्रमुख याजकांनी व वडील यांनी “बरब्बाला सोडा” अशी मागणी करून येशूंना जिवे मारावे म्हणून समुदायाचे मन वळविले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options