मत्तय २४:२९-३०
२९
“क्लेशांच्या काळाची समाप्ती झाल्यावर “ ‘त्या दिवसात, सूर्य अंधकारमय होईल, आणि चंद्र आपला प्रकाश देणार नाही; आकाशातून तारे गळून पडतील, आणि आकाशमंडळ डळमळेल.’
३०
“मानवपुत्राच्या आगमनाचे चिन्ह आकाशात दिसेल आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे मोठा आक्रोश करतील. ते मानवपुत्राला आकाशात मेघारूढ होऊन पराक्रमाने परत येत असलेले पाहतील.
Settings