Skip to content
मत्तय ११:२५-३०

येशू पित्याची स्तुती करून विश्रांती देतो

मत्तय ११:२५-३०
२५
त्यावेळी येशूंनी ही प्रार्थना केली, “हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू, स्वतःस ज्ञानी आणि सुज्ञ समजणार्‍या लोकांपासून या गोष्टी गुप्त ठेऊन, त्या तुम्ही लहान बालकांना प्रगट केल्यास म्हणून मी तुमचे आभार मानतो.
२६
कारण हे पित्या, असे करणेच तुम्हाला उचित वाटले.
२७
“माझ्या पित्याने माझ्याकडे सर्वकाही सोपविले आहे. पित्याशिवाय पुत्राला कोणी ओळखत नाही, आणि पिता कोण आहे हे पुत्राशिवाय, आणि पुत्र ज्यांना प्रकट करण्यास निवडतो त्यांच्याशिवाय कोणालाही माहीत नाही.
२८
“जे तुम्ही थकलेले आणि भाराक्रांत आहात, ते तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईन.
२९
माझे जू आपणावर घ्या आणि माझ्याकडून शिका; कारण मी सौम्य व लीन मनाचा आहे आणि तुमच्या आत्म्याला विसावा मिळेल.
३०
कारण माझे जू हलके व माझे ओझे सहज पेलवणारे आहे.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options