Skip to content
मत्तय ११:१६-१९

प्रतिसाद न देणारी पिढी

मत्तय ११:१६-१९
१६
“या पिढीच्या लोकांची तुलना मी कशाशी करू? बाजारात बसून इतरांना हाक मारणार्‍या लहान मुलांसारखी ही पिढी आहे:
१७
“ ‘आम्ही तुमच्यासाठी बासरी वाजविली तरी तुम्ही नाचला नाही; आम्ही शोकगीत गाईले, तरी तुम्ही शोक केला नाही.’
१८
कारण योहान काहीही न खाता किंवा पिता आला होता आणि ते म्हणतात, ‘तो दुरात्म्याने ग्रस्त आहे.’
१९
मनुष्याचा पुत्र खातपीत आला आणि ते म्हणतात, ‘पाहा, हा खादाड आणि मद्यपी मनुष्य! जकातदार आणि पापी लोकांचा मित्र!’ परंतु ज्ञान आपल्या कृत्याने खरे सिद्ध झाले आहे.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options