मुख्य मजकुरावर जा
मार्क ६:५३-५६

गनेसरेतमध्ये सर्वत्र बरे करणे

मार्क ६:५३-५६
५३
ते पलीकडे गेल्यावर गनेसरेत येथे उतरले व त्यांनी होडी तिथे लावली,
५४
ते होडीतून उतरले न उतरले तोच, लोकांनी येशूंना ओळखले;
५५
लोक त्या संपूर्ण परिसरात धावत गेले आणि ते जिथे कुठे आहे असे त्यांनी ऐकले तिथे आजारग्रस्त लोकांना अंथरुणावर घालून त्यांच्याकडे घेऊन गेले.
५६
आणि जिथे कुठेही येशू गेले—गावात, शहरात—बाजारपेठेत लोक आजार्‍यांना घेऊन जात आणि तुमच्या झग्याच्या काठाला तरी स्पर्श करू द्या अशी त्यांना विनंती करत आणि जितक्यांनी त्यांना स्पर्श केला तितके सर्व बरे झाले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options