मार्क ५:१७-२४
१७
तेव्हा येशूंनी आमच्या भागातून निघून जावे अशी लोकांनी त्यांना विनंती केली.
१८
येशू पुन्हा होडीत चढत असताना, जो मनुष्य पूर्वी भूतग्रस्त होता, त्याने आपल्यालाही बरोबर न्यावे, अशी येशूंना विनंती केली.
१९
पण येशूंनी ती मान्य केली नाही, परंतु ते त्याला म्हणाले, “आपल्या प्रियजनांकडे घरी जा आणि प्रभूने तुझ्यासाठी जे काही केले आणि तुझ्यावर किती मोठी दया केली हे त्यांना सांग.”
२०
त्याप्रमाणे तो मनुष्य गेला आणि त्या भागात असलेल्या दकापलीस येथे येशूंनी त्याच्यासाठी किती मोठ्या गोष्टी केल्या हे सांगू लागला आणि प्रत्येकजण विस्मयाने थक्क झाला.
२१
जेव्हा येशू होडीत बसून पलीकडच्या तीरावर गेले, तेव्हा त्यांच्याभोवती खूप मोठा समुदाय गोळा झाला, त्यावेळी ते सरोवराच्या किनार्याजवळ होते.
२२
त्यावेळी याईर नावाचा सभागृहाचा एक पुढारी आला, येशूंना पाहून त्यांच्या पाया पडला.
२३
त्यांना आग्रहाने विनंती करू लागला, “माझी लहान मुलगी मरणाच्या पंथाला लागली आहे, कृपा करून या व आपला हात तिच्यावर ठेवा म्हणजे ती बरी होईल व वाचेल.”
२४
म्हणून येशू त्यांच्याबरोबर निघाले. सभोवतालचा जमावही त्यांच्याबरोबर निघाला व गर्दी करू लागला.
Settings