मार्क ११:१-३
१
ते यरुशलेमजवळ आले आणि जैतून डोंगरावर असलेल्या बेथफगे व बेथानी या गावात आले, तेव्हा येशूंनी आपल्या शिष्यांपैकी दोन शिष्यांना असे सांगून पाठविले,
२
“समोरच्या गावात जा आणि तिथे शिरताच, ज्याच्यावर कधी कोणी स्वार झाले नाही असे एक शिंगरू बांधून ठेवलेले तुम्हाला आढळेल, ते सोडून इकडे आणा.
३
‘तुम्ही हे का करीत आहात?’ असे जर कोणी तुम्हाला विचारले, तर एवढेच म्हणा की, ‘प्रभूला त्याची गरज आहे आणि ते लगेच त्याला पाठवून देतील.’ ”
Settings