Skip to content
मलाखी १:११-१४

मलाखी १:११-१४

११
“जिथून सूर्य उगवतो व जिथे तो मावळतो तिथपर्यंतच्या सर्व राष्ट्रांमध्ये माझे नाम महान केले जाईल. प्रत्येक ठिकाणी माझ्या सन्मानार्थ सुवासिक धूप जाळण्यात येईल व शुद्ध अर्पणे वाहण्यात येतील, कारण माझे नाम सर्व राष्ट्रांमध्ये थोर होईल,” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.
१२
“ ‘प्रभूचा मेज अशुद्ध आहे’ व ‘त्यावरील अन्न तुच्छ आहे,’ असे सांगून तुम्ही माझे नाम अपवित्र करता.
१३
‘किती हे ओझे आहे!’ असे म्हणून तुम्ही त्याकडे घृणेने नाक मुरडता,” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात. “जेव्हा तुम्ही जखमी, लंगडे आणि आजारी पशू आणता व ते अर्पणे म्हणून वाहता, मी ते तुमच्या हातून स्वीकारावे काय?” याहवेह असे म्हणतात.
१४
“प्रभूला आपल्या कळपातील एखादा धष्टपुष्ट मेंढा असूनही व त्याचे अर्पण करण्याचे वचन देऊन, जो आजारी असलेला मेंढा अर्पण करतो, तो लबाड शापित असो. कारण मी परमथोर राजा आहे आणि माझे नाव सर्व देशांमध्ये अत्यंत भयनीय आहे.” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options