Skip to content
लूक ८:२७-३२

लूक ८:२७-३२

२७
येशू होडीतून किनार्‍यावर उतरले, त्यावेळी त्यांची भेट दुरात्म्याने पछाडलेल्या एक मनुष्याशी झाली. बर्‍याच काळापर्यंत हा मनुष्य बेघर आणि वस्त्रहीन अवस्थेत असून कबरस्तानात राहत होता.
२८
येशूंना पाहिल्याबरोबर तो त्यांच्या पाया पडून ओरडून म्हणाला, “हे येशू परात्पर परमेश्वराच्या पुत्रा, तुम्हाला माझ्याशी काय काम आहे, मी तुमच्याजवळ विनंती करतो की, कृपा करून मला छळू नका.”
२९
कारण येशूंनी त्या दुरात्म्याला त्याच्यामधून बाहेर पडण्याची आज्ञा केली होती. तरी पुष्कळदा तो त्याच्यावर प्रबळ होत असे आणि जरी त्याचे हातपाय साखळ्यांनी बांधले आणि पहारा ठेवला, तरी साखळ्या तोडून त्याला एकांत ठिकाणाकडे घेऊन जात असे.
३०
येशूंनी त्याला विचारले, “तुझे नाव काय आहे?” “माझे नाव लेगियोन आहे,” त्याने उत्तर दिले. कारण त्याच्यामध्ये पुष्कळ दुरात्मे वास करीत होते.
३१
ते दुरात्मे येशूंना पुन्हा आणि पुन्हा विनंती करू लागले, “आम्हाला अथांग कूपात जाण्याची आज्ञा करू नका.”
३२
जवळच डोंगराच्या कडेला डुकरांचा एक कळप चरत होता. तेव्हा दुरात्म्यांनी, “आम्हाला डुकरांमध्ये जाऊ द्या,” अशी येशूंना विनंती केली आणि येशूंनी त्यांना तशी परवानगी दिली.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options