Skip to content
लूक ७:२१-२४

लूक ७:२१-२४

२१
त्याच घटकेस, येशूंनी पुष्कळ लोकांस रोग, पीडा व दुरात्मे यापासून मुक्त केले होते आणि पुष्कळ आंधळ्यांना दृष्टी दिली.
२२
तेव्हा जे निरोप घेऊन आले होते त्यांना म्हणाले, “तुम्ही जे पाहिले आणि ऐकले ते योहानाला सांगा: आंधळ्यांना दृष्टी मिळते, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिर्‍यांना ऐकू येते, मेलेले जिवंत होतात आणि गरीब लोकांना शुभवार्ता सांगितली जाते.
२३
जो कोणी माझ्यासंबंधाने अडखळत नाही तो धन्य होय.”
२४
योहानाचे शिष्य गेल्यानंतर, येशू जमावाशी योहानाविषयी बोलू लागले. ते म्हणाले, “तुम्ही ओसाड अरण्यात काय पाहण्यासाठी गेला? वार्‍याच्या झोताने हलणार्‍या लव्हाळ्याला काय?
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options