Skip to content
लूक ६:२०-२६

धन्यवचने आणि धिक्कार

लूक ६:२०-२६
२०
नंतर आपल्या शिष्यांना पाहून म्हणाले: “जे दीन आहेत ते तुम्ही धन्य, कारण परमेश्वराचे राज्य तुमचे आहे.
२१
जे आता भुकेले आहेत ते तुम्ही धन्य, कारण ते तृप्त होतील. जे आता विलाप करीत आहात ते तुम्ही धन्य कारण तुम्ही हसाल.
२२
मानवपुत्रामुळे जेव्हा लोक तुमचा द्वेष करतात, तुमच्यावर बहिष्कार टाकतात आणि तुमचा अपमान करतात, दुष्ट म्हणून तुमचे नाव नाकारतात, तेव्हा तुम्ही धन्य.
२३
“त्या दिवशी आनंदाने उड्या मारा, कारण स्वर्गामध्ये तुमचे प्रतिफळ मोठे आहे. त्यांच्या पूर्वजांनीही संदेष्ट्यांना असेच वागविले होते.
२४
“तुम्हा श्रीमंतास धिक्कार असो, कारण तुम्हाला तुमचे सांत्वन आधीच मिळाले आहे.
२५
जे तुम्ही आता तृप्त आहात, त्या तुम्हाला धिक्कार असो, कारण तुम्ही उपाशी राहाल. आता जे तुम्ही हसत आहात, त्या तुम्हाला धिक्कार असो, कारण तुम्ही विलाप कराल व रडाल.
२६
जेव्हा सर्व लोक तुम्हाविषयी चांगले बोलतात, त्या तुम्हाला धिक्कार असो, कारण आपले पूर्वज खोट्या संदेष्ट्यांना असेच वागवित असत.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options