लूक ३:७-९
७
त्याच्याकडून बाप्तिस्मा घेण्यासाठी आलेल्या समुदायास योहान म्हणाला, “अहो सापांच्या पिलांनो, येणार्या क्रोधापासून पळून जाण्यास तुम्हाला कोणी सावध केले?
८
पश्चात्तापाला साजेल अशी फळे द्या. ‘आमचा पिता तर अब्राहाम आहे,’ असे आपल्या मनात म्हणू नका. कारण मी तुम्हाला सांगतो की, परमेश्वर या दगडांपासून देखील अब्राहामासाठी संतती निर्माण करण्यास समर्थ आहे.
९
कुर्हाड आधीच झाडांच्या मुळावर ठेवलेली आहे आणि प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडले जाईल आणि अग्नीत टाकण्यात येईल.”
Settings