लूक १६:२५-३१
२५
“परंतु अब्राहामाने उत्तर दिले, ‘मुला, तुझ्या आयुष्यात तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या, पण लाजराला वाईट गोष्टी मिळाल्या, म्हणून तो आता सांत्वन पावत आहे आणि तू क्लेश भोगीत आहेस.
२६
आणि याव्यतिरिक्त, आमच्या आणि तुमच्यामध्ये एक मोठी दरी स्थापलेली आहे, जे येथून तुझ्याकडे जाण्याची इच्छा करतात ते जाऊ शकत नाहीत किंवा तिथून आम्हापर्यंत ती दरी ओलांडून कोणीही येऊ शकत नाही.’
२७
“तो म्हणाला, ‘मग हे पित्या, मी तुम्हाला विनवितो की, लाजाराला माझ्या कुटुंबाकडे पाठवा.
२८
कारण मला पाच भाऊ आहेत. ते सुद्धा या यातना स्थळी येऊ नयेत, म्हणून त्याने त्यांना सावध करावे.’
२९
“पण अब्राहामाने उत्तर दिले, ‘त्यांच्याजवळ मोशे आणि संदेष्टे आहेत त्यांचे त्यांनी ऐकावे.’
३०
“ ‘हे पित्या अब्राहामा, असे नाही. परंतु मृतातून त्यांच्याकडे कोणी गेले तर, ते पश्चात्ताप करतील.’
३१
“अब्राहाम त्याला म्हणाला, ‘ते मोशे किंवा संदेष्ट्यांचे ऐकत नाहीत, तर मृतातून जिवंत होऊन कोणी गेला, तरी ते निश्चितच ऐकणार नाहीत.’ ”
Settings