लूक १:६८-७२
६८
“प्रभूची स्तुती करा! इस्राएलाच्या परमेश्वराची स्तुती करा, कारण ते आपल्या लोकांकडे आले आहेत आणि त्यांनी त्यांच्यासाठी खंडणी भरली आहे.
६९
त्यांनी आपला सेवक दावीदाच्या घराण्यातून आपल्यासाठी तारणाचे शिंग उभारले आहे.
७०
जसे त्यांनी फार पूर्वी आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते—
७१
आमच्या शत्रूपासून आणि आमचा द्वेष करणार्या सर्वांच्या हातातून आमचा उद्धार करावा,
७२
आमच्या पूर्वजांवर दया करावी आणि त्यांच्या पवित्र कराराची आठवण करावी.
Settings