लेवीय ८:१४-२३
१४
मग मोशेने पापार्पणाच्या यज्ञबलीसाठी एक गोर्हा आणला आणि अहरोन व त्याच्या पुत्रांनी त्या गोर्ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले.
१५
मग मोशेने त्या गोर्ह्याचा वध केला आणि वेदी पवित्र करण्यासाठी त्या गोर्ह्याचे रक्त वेदी व तिची चारही शिंगे यांना आपल्या बोटांनी लावले. शिल्लक राहिलेले रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतले. अशाप्रकारे वेदीसाठी प्रायश्चित्त करून त्याने वेदी पवित्र केली.
१६
मोशेने आतड्यांवरील सर्व चरबी, काळजावरील लांब पाळ, दोन्ही गुरदे काढून घेऊन तिचे वेदीवर हवन केले.
१७
याहवेहने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने गोर्हा, त्याची कातडी, त्याचे मांस आणि आतडी छावणीबाहेर नेऊन जाळून टाकले.
१८
नंतर त्याने होमार्पणासाठी एक मेंढा घेतला आणि अहरोन व त्याच्या पुत्रांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले.
१९
नंतर मोशेने त्याचा वध केला आणि त्या मेंढ्याचे रक्त वेदीभोवती शिंपडले.
२०
मग मोशेने तो मेंढा कापून त्याचे तुकडे केले आणि त्या तुकड्यांसह डोके व चरबी यांचा होम केला.
२१
त्याची आतडी व खूर पाण्याने धुऊन त्याने संपूर्ण मेंढ्याचे वेदीवर होम केले. हे होमार्पण आहे. ते सुवासिक असे, याहवेहसाठी सादर केलेले अन्नार्पण आहे, जसे याहवेहने मोशेला आज्ञा केली होती.
२२
मग मोशेने दुसरा मेंढा, अर्थात् समर्पणाचा मेंढा घेतला व अहरोन व त्याच्या पुत्रांनी मेंढ्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले.
२३
मग मोशेने त्याचा वध केला व त्याचे काही रक्त घेऊन ते अहरोनाच्या उजव्या कानाच्या पाळीला व उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्यांना लावले.
Settings