Skip to content
लेवीय ७:६-१०

लेवीय ७:६-१०

याजकवर्गातील प्रत्येक पुरुषाला हा बली खाण्याचा अधिकार असून त्यांनी तो बली पवित्रस्थानातच बसून खावा; कारण हे परमपवित्र आहे.
“पापार्पणासारखेच दोषार्पण आहे; त्या दोघांचे नियम सारखेच आहेत. अर्पिलेला हा बली प्रायश्चित्तविधी करणार्‍या याजकाच्याच अधिकाराचा होईल.
जो याजक एखाद्या मनुष्याच्या वतीने होमार्पण करेल, त्या अर्पण पशूच्या कातडीवर त्या याजकाचाच हक्क असेल.
भाजलेल्या किंवा शिजविलेल्या किंवा तळलेल्या प्रत्येक अन्नधान्याचे अर्पण, विधी करणार्‍या याजकाचे होईल,
१०
अन्नधान्याचे प्रत्येक अर्पण, जैतुनाच्या तेलात मिश्रण केलेली किंवा कोरडी, अहरोनाच्या सर्व पुत्रांच्या सामूहिक मालकीची आहेत.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options