लेवीय ६:२४-३०
२४
याहवेह मोशेला म्हणाले,
२५
“अहरोन व त्याच्या पुत्रांना सांग, पापार्पणासंबंधी नियम हे आहेत: ज्या स्थळी होमार्पणाच्या पशूंचा वध करतात त्याच स्थळी या पापार्पणाच्या पशूचाही याहवेहसमोर वध करावा. हे परमपवित्र आहे.
२६
ज्या याजकाने हा पापार्पणविधी केला असेल, त्याने सभामंडपाच्या अंगणात पवित्रस्थानात ते खावे.
२७
जे काही या मांसाला स्पर्श करेल ते पवित्र होईल आणि जर काही रक्त वस्त्रावर उडाले असेल, तर ते तुम्ही पवित्रस्थानी धुवावे.
२८
ज्या मातीच्या पात्रात मांस शिजविले असेल, ते पात्र फोडून टाकावे पण तांब्याच्या पात्रात शिजविले असेल; तर ते पात्र घासून पाण्याने धुवावे.
२९
याजकीय घराण्यातील कोणीही पुरुष ते खाऊ शकतात; ते परमपवित्र आहे.
३०
परंतु कोणतेही पापार्पण, ज्याचे रक्त पवित्रस्थानात प्रायश्चित्त करण्यासाठी सभामंडपात आणले जाते ते खाऊ नये; ते जाळून टाकावे.”
Settings