Skip to content
लेवीय ७:१५-१९

लेवीय ७:१५-१९

१५
उपकारस्तुती करिता अर्पिलेल्या शांत्यर्पणातील यज्ञबलीचे मांस अर्पण केल्या दिवशीच खावे; सकाळपर्यंत त्यातील काही शिल्लक ठेऊ नये.
१६
“परंतु यज्ञबलीचे अर्पण नवसाचे अथवा स्वैच्छिक असेल, तर अर्पणातील भाग त्या दिवशीच खावे, पण उरलेले भाग दुसर्‍या दिवशी खाण्यास हरकत नाही.
१७
अर्पणातील काही मांस तिसर्‍या दिवसापर्यंत शिल्लक राहिले असेल तर ते अग्नीत जाळून टाकावे.
१८
शांत्यर्पणाच्या मांसापैकी काही मांस तिसर्‍या दिवशी खाल्ले, तर ज्याने ते अर्पण केले असेल त्याला स्वीकारले जाणार नाही. त्याचे त्यांना काहीच श्रेय मिळणार नाही, कारण ते अशुद्ध झाले आहे; त्यापैकी काहीही खाणारा व्यक्ती जबाबदार धरला जाईल.
१९
“ ‘ज्या मांसाचा स्पर्श एखाद्या विधिनियमानुसार अपवित्र वस्तूला झाल्यास ते खाऊ नये; ते जाळून टाकावे. दुसरे मांस जो कोणी विधिपूर्वक शुद्ध आहे, तो ते खाऊ शकतो.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options