लेवीय ७:७-१०
७
“पापार्पणासारखेच दोषार्पण आहे; त्या दोघांचे नियम सारखेच आहेत. अर्पिलेला हा बली प्रायश्चित्तविधी करणार्या याजकाच्याच अधिकाराचा होईल.
८
जो याजक एखाद्या मनुष्याच्या वतीने होमार्पण करेल, त्या अर्पण पशूच्या कातडीवर त्या याजकाचाच हक्क असेल.
९
भाजलेल्या किंवा शिजविलेल्या किंवा तळलेल्या प्रत्येक अन्नधान्याचे अर्पण, विधी करणार्या याजकाचे होईल,
१०
अन्नधान्याचे प्रत्येक अर्पण, जैतुनाच्या तेलात मिश्रण केलेली किंवा कोरडी, अहरोनाच्या सर्व पुत्रांच्या सामूहिक मालकीची आहेत.”
Settings