मुख्य मजकुरावर जा
लेवीय ६:८-१३

अर्पणांचे नियम: होमबली

लेवीय ६:८-१३
याहवेह मोशेला म्हणाले,
“अहरोन आणि त्याच्या पुत्रांना अशी आज्ञा कर, होमार्पणासाठी पाळावयाचे नियम हे आहेत: होमार्पण रात्रभर वेदीवर ठेवून ते सकाळपर्यंत राहू द्यावे आणि त्या वेदीवरील अग्नी जळत ठेवावा.
१०
नंतर याजकाने त्याची तागमिश्रित वस्त्रे, त्याचबरोबर त्याची अंतर्वस्त्रे अंगावर घालावी आणि वेदीवरील अग्नीत भस्म झालेली होमार्पणाची राख काढावी आणि ती वेदीच्या बाजूला ठेवावी.
११
मग त्याने आपली वस्त्रे बदलून, दुसरी वस्त्रे घालावी आणि ती राख छावणीबाहेरील विधिपूर्वक स्वच्छ केलेल्या ठिकाणी न्यावी.
१२
वेदीवरील अग्नी सतत पेटलेला ठेवावा, तो विझू देऊ नये. तो पेटलेला ठेवण्यासाठी याजकाने रोज सकाळी वेदीवर लाकडे ठेवावी व त्यावर होमबली रचून शांत्यर्पणाच्या अर्पणाच्या चरबीचे हवन करावे.
१३
वेदीवरील अग्नी सतत पेटलेला ठेवावा; तो कधीही विझू देऊ नये.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options