मुख्य मजकुरावर जा
लेवीय ६:१४-१८

अर्पणांचे नियम: अन्नार्पण

लेवीय ६:१४-१८
१४
“अन्नार्पणासंबंधी नियम आहेत ते हे: अहरोनाच्या पुत्रांनी याहवेहसमोर वेदीपुढे अर्पण करावे.
१५
मग याजकांनी सुगंधी मसाले व जैतुनाचे तेल व धूप घ्यावा आणि मळलेला अन्नार्पणातील मूठभर सपीठ घ्यावे व संपूर्ण अर्पणाचा स्मरणभाग म्हणून वेदीवर त्याचे हवन करावे. हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध असेल.
१६
उर्वरित भाग अहरोन आणि त्याचे पुत्र खातील, परंतु त्यांनी ते खमीर न घालता पवित्रस्थानात खावे; त्यांनी ते सभामंडपाच्या अंगणात खावे.
१७
तो खमिरासह भाजू नये. मला अर्पिलेल्या होमार्पणाचा हा भाग मी माझ्या अर्पणातून याजकांना त्यांचा वाटा म्हणून दिला आहे. दोषार्पण व पापार्पण त्याप्रमाणेच हे देखील परमपवित्र आहे.
१८
अहरोनाच्या संतानांतील फक्त पुरुषांनी ते खावे आणि याहवेहला अर्पिलेला अन्नार्पणाचा हा भाग त्यांच्यासाठी पिढ्यान् पिढ्या कायमचा वाटा राहावा. जे कोणी यास स्पर्श करतील, ते पवित्र गणले जातील.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options