Skip to content
लेवीय ४:१६-२१

लेवीय ४:१६-२१

१६
नंतर अभिषिक्त याजकाने त्या गोर्‍ह्याचे काही रक्त सभामंडपात घेऊन जावे.
१७
याजकाने त्याची बोटे त्यात बुडवून याहवेहसमोर पडद्यापुढे ते सात वेळा शिंपडावे.
१८
त्यातील काही रक्त घेऊन ते याहवेहपुढे सभामंडपातील वेदीच्या शिंगांना लावावे व राहिलेले सर्व रक्त सभामंडपाच्या प्रवेशद्वाराकडे असलेल्या होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याशी ओतावे.
१९
त्याने त्यावरील सर्व चरबी काढावी आणि तिचे वेदीवर होम करावे.
२०
पापार्पणाच्या गोर्‍ह्यासंबंधीच्या विधीप्रमाणेच त्याने या गोर्‍ह्याचेही करावे. अशा प्रकारे याजकाने संपूर्ण समुदायासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्यांची क्षमा होईल.
२१
नंतर तो गोर्‍हा वस्तीबाहेर काढून, जसा पहिला गोर्‍हा त्याने जाळून टाकला तसाच हा गोर्‍हा जाळून टाकावा. समुदायासाठी हे पापार्पण आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options