लेवीय २६:३४
आजूबाजूच्या संदर्भासह वचन ३४ दाखवत आहे.
३१
तसेच मी तुमची शहरे उजाड करेन, तुमची पवित्रस्थाने ओसाड करेन आणि तुमच्या सुगंधी द्रव्यांचा सुवास घेणार नाही.
३२
मी देश ओसाड करेन, म्हणजे तुमचे शत्रू जे त्यात राहतील ते त्यामुळे गांगरून जातील.
३३
मी तुमची राष्ट्रांमध्ये पांगापांग करेन आणि मी माझी तलवार उगारून तुमच्या पाठीस लागेन. तुमचा देश उजाड होईल आणि तुमच्या शहरांचा नाश होईल.
३४
जेव्हा तुम्ही शत्रूंच्या देशात असाल, तुमचा देश उजाड होईल; तेव्हा भूमीला विश्रांती मिळेल व भूमी तिच्या शब्बाथ वर्षांचा संपूर्ण वेळ आनंद करेल.
३५
अनेक वर्षे ती उजाड होती, तुम्ही तिथे राहत असताना शब्बाथाच्या काळामध्ये तिला विश्रांती मिळाली नाही म्हणून ती आता विश्रांती घेईल.
३६
“ ‘तुमच्यातील जे उर्वरित राहतील, त्यांच्या शत्रूंच्या देशात मी त्यांची अंतःकरणे इतकी भयभीत करेन, की वार्याने उडून जाणार्या पानांचा आवाजसुद्धा त्यांना असा पळ काढावयास लावील की जणू एखादा तलवार घेऊन त्यांच्या पाठीशी लागला आहे आणि कोणीही त्यांचा पाठलाग करत नसले तरी ते पडतील.
३७
कोणी पाठलाग करीत नसतानाही तलवार पाठीस लागल्याप्रमाणे अडखळून एकमेकांवर पडतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या शत्रूंसमोर उभे राहू शकणार नाही.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings