Zum Inhalt springen
लेवीय २३:३४-४३

लेवीय २३:३४-४३

३४
“इस्राएली लोकांना सांग: ‘सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून याहवेहकरिता मंडपाचा सण सात दिवस पाळावा.
३५
पहिला दिवस हा पवित्र मेळावा आहे. कोणतेही नियमित काम या दिवशी करू नये.
३६
सात दिवस याहवेहला अन्नार्पण करा आणि आठव्या दिवशी पवित्र मेळावा भरवून याहवेहला अन्नार्पण करा. हा मेळाव्याचा समारोप आहे; कोणतेही नियमित काम करू नका.
३७
(“ ‘हे याहवेहने स्थापित केलेले सण आहेत, जे तुम्ही याहवेहला अन्नार्पण करण्यासाठी पवित्र मेळावे घोषित करावे; होमार्पण, धान्यार्पण, शांत्यर्पण व पेयार्पण आवश्यक त्या दिवशी अर्पणे करावी.
३८
ही अर्पणे याहवेहच्या शब्बाथांच्या व्यतिरिक्त आहेत आणि हे यज्ञ तुम्ही परमेश्वराला अर्पण करता त्या तुमच्या देणग्या आणि नवस फेडावयाची अर्पणे आणि स्वैच्छिक अर्पणे त्या व्यतिरिक्त आहेत.)
३९
“ ‘सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी, जेव्हा तुम्ही जमिनीचे पीक गोळा कराल, तेव्हा सात दिवस याहवेहपुढे सण पाळावा. पहिला दिवस हा शब्बाथ, विश्रामदिन आणि आठवा दिवसही शब्बाथाचा विश्रामदिन असेल.
४०
पहिल्या दिवशी तुम्ही दाट पाने असलेल्या झाडांच्या फांद्या—खजुरीच्या झावळ्या, वाळुंजे, आणि भरपूर पाने असलेली इतर झाडांच्या फांद्या—घेऊन याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे सात दिवस आनंदोत्सव करावा.
४१
हा सात दिवसांचा वार्षिक सण तुम्ही याहवेहसाठी प्रत्येक वर्षी पाळावा. हा सर्वकाळचा नियम येणार्‍या पिढ्यांसाठी आहे; सातव्या महिन्यात हा सण साजरा करावा.
४२
या सात दिवसात इस्राएली वंशातील सर्वांनी डहाळ्याच्या मंडपात राहावे
४३
यासाठी की, तुमच्या भावी पिढीला हे कळावे की, जेव्हा मी इस्राएलच्या घराण्याला इजिप्तमधून बाहेर काढले तेव्हा मी त्यांना मंडपात राहायला लावले. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options