लेवीय २३:३-४
३
“ ‘आठवड्यातील सहा दिवस त्यांनी कामकाज करावे, परंतु सातवा दिवस हा शब्बाथ, विश्रांतीचा दिवस आहे. पवित्र मेळाव्याचा दिवस. तुम्ही कोणतेही काम करू नये; तुम्ही कुठेही राहत असाल तरी याहवेहसाठी हा शब्बाथ आहे.
४
“ ‘याहवेहने नेमून दिलेले हे पवित्र सण आहेत, पवित्र मेळाव्यांची घोषणा तुम्ही त्यांच्या ठरवून दिलेल्या वेळांमध्ये करावी:
Settings