Skip to content
लेवीय २२:२०-२४

लेवीय २२:२०-२४

२०
दोष असलेला कोणताही प्राणी अर्पण करू नये, कारण ते तुमच्यावतीने मान्य केले जाणार नाहीत.
२१
याहवेहसाठी कोणी स्वतःच्या गुरांतून किंवा शेरडामेंढरांतून शपथपूर्तीचे किंवा स्वखुशीचे शांत्यर्पण करेल, तर ते मान्य होण्यासाठी ते निर्दोष प्राण्याचेच असावे.
२२
याहवेहला आंधळा, हाड तुटलेला, लुळा किंवा अंगावर मस, इसब अथवा खरूज असलेला असा कोणताही प्राणी अर्पण करू नका. यापैकी काहीही वेदीवर याहवेहला हवन म्हणून अर्पण ठेऊ नका.
२३
तुम्ही एखाद्या गोर्‍ह्याला किंवा मेंढ्याला, एखादा अवयव जास्त वा कमी असेल, तर तो प्राणी स्वखुशीचे अर्पण म्हणून चालेल, पण शपथपूर्तीचे अर्पण म्हणून तो अर्पण करता येणार नाही.
२४
ज्या प्राण्याचे अंडकोश ठेचलेले किंवा चिरडलेले किंवा फाटलेले किंवा कापलेले असेल, त्याचे अर्पण याहवेहला कधीही करू नये. तुमच्या स्वतःच्या देशात असे करू नका.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options