Skip to content
लेवीय २१:१७-२३

लेवीय २१:१७-२३

१७
“अहरोनास सांग, ‘पिढ्यान् पिढ्या त्याच्या कुळातील शरीराने अपंग असलेल्या कोणीही अन्नार्पण करण्यासाठी परमेश्वराजवळ येऊ नये.
१८
एखादा मनुष्य आंधळा, लंगडा, चपट्या नाकाचा, हातापायांना अधिक बोटे असलेला;
१९
ज्याचा पाय किंवा हात तुटलेला आहे,
२०
कुबडा, ठेंगणा, डोळ्यात कमतरता असलेला, त्वचेचे रोग असलेला व भग्नांड असून
२१
तो अहरोन याजकाचा वंशज असला, तरी शारीरिक व्यंग असल्यामुळे त्याने याहवेहला अन्न अर्पिण्यास जाऊ नये; त्याच्यात कमतरता आहे; त्याने त्याच्या परमेश्वराजवळ अन्नार्पण करण्यासाठी जाऊ नये.
२२
तरी त्याच्या परमेश्वराचे परमपवित्र अन्न व पवित्र अन्न तो खाऊ शकतो;
२३
पण त्याला शारीरिक व्यंग असल्यामुळे त्याने पडद्यामागील परमपवित्रस्थानात किंवा वेदीजवळही जाऊ नये, त्याने तसे केल्यास, माझे पवित्रस्थान भ्रष्ट होईल, कारण त्यांना पवित्र करणारा मीच याहवेह आहे.’ ”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options