Skip to content
लेवीय २०:२-६

मोलेकाची उपासना केल्याबद्दल मृत्युदंड

लेवीय २०:२-६
“इस्राएली लोकांना सांग: इस्राएली लोकांपैकी कोणीही किंवा तुमच्यात राहणाऱ्या कोणत्याही परदेश्याने त्याच्या मुलाचे अर्पण मोलख दैवतासाठी केले, तर समुदायातील सभासदांनी त्याला दगडमार करावा.
मी स्वतः त्या मनुष्याच्या विरुद्ध माझे मुख फिरवेन व लोकातून त्याच्या उच्छेद करेन; कारण त्याने आपले मूल मोलख दैवताला बळी देऊन व माझे पवित्रस्थान भ्रष्ट करून माझ्या पवित्र नावाचा अपमान केला आहे.
पण जर त्या मनुष्याने आपले मूल मोलखला बळी दिले हे माहीत असूनही त्या समुदायाच्या लोकांनी त्याकडे डोळेझाक केली व बळी देणार्‍याला मारून टाकण्याचे नाकारले,
मी स्वतः त्याच्याविरुद्ध व त्याच्या घराण्याविरुद्ध मुख फिरवेन आणि मोलखबरोबर व्यभिचार करून त्याचे अनुकरण करणार्‍या सर्वांचा त्यांच्या लोकांतून नाश करेन.
“ ‘शकुनविद्या आणि चेटक्यांची अनुसरण करून स्वतःला वेश्या करण्याचा प्रयत्न करणार्‍यांकडून मी माझे मुख फिरवेन आणि मी त्याचा त्याच्या लोकांमधून उच्छेद करेन.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options