Skip to content
लेवीय १९:१९-२२

मिश्रण आणि रूढींवरील मनाई

लेवीय १९:१९-२२
१९
“ ‘माझ्या आज्ञा पाळा. “ ‘तुम्ही आपल्या पशूंना भिन्न जातीच्या जनावरांशी संग करू देऊ नये. “ ‘तुमच्या शेतात दोन प्रकारच्या बियांची पेरणी करू नका. “ ‘दोन प्रकारच्या कापडांपासून विणलेली वस्त्रे वापरू नयेत.
२०
“ ‘एखादा मनुष्य एखाद्या गुलाम स्त्रीसोबत झोपेल जी एखाद्या पुरुषाशी वाग्दत्त झाली असेल, परंतु ज्याला खंडणी दिली गेली नाही किंवा तिला स्वातंत्र्य दिले गेले नाही, तर त्याला योग्य शिक्षा झाली पाहिजे. तरीही त्यांना मृत्युदंड दिला जाऊ नये, कारण तिला मुक्त केले गेले नाही.
२१
त्या मनुष्याने याहवेहसाठी सभामंडपाच्या दाराशी आपले दोषार्पण म्हणून एक मेंढा आणलाच पाहिजे.
२२
त्या मनुष्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने त्या मेंढ्याद्वारे याहवेहसमोर प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्याने केलेल्या पापाची त्याला क्षमा होईल.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options