Skip to content
लेवीय १८:२४-२९

लेवीय १८:२४-२९

२४
“ ‘अशा प्रकारच्या कोणत्याही अमंगळ गोष्टी करून तुम्ही स्वतःला अपवित्र करून घेऊ नये, कारण ज्या राष्ट्रात मी तुम्हाला पाठवित आहे, ती राष्ट्रे या गोष्टींनी भ्रष्ट झाली आहेत.
२५
भूमीसुद्धा भ्रष्ट झाली होती; म्हणून तिच्या पापाबद्दल मी तिला शिक्षा केली आहे, भूमीने तेथील रहिवाशांना देशाबाहेर ओकारीसारखे फेकून दिले आहे.
२६
म्हणून तुम्ही माझे नियम व विधी पाळा आणि वर उल्लेख केलेल्या कोणत्याही ओंगळ गोष्टी करू नका. हे नियम इस्राएली लोकांना व तुमच्यात राहत असलेल्या विदेशी लोकांनाही लागू आहेत,
२७
ज्या देशात मी तुम्हाला घेऊन जात आहे, त्या देशातील रहिवाशांनी अशा ओंगळ गोष्टी सतत केल्या म्हणून तो देश भ्रष्ट झाला.
२८
जर तुम्ही ही भूमी भ्रष्ट कराल, तर ती तुम्हाला ओकून टाकेल, जसे तुमच्या पूर्वी असलेल्या राष्ट्रांना तिने ओकून टाकले होते.
२९
“ ‘या ओंगळ कृत्यांपैकी एकदेखील कृत्य जो करेल, त्याला या राष्ट्रातून बहिष्कृत केले जाईल.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options