लेवीय १८:१९-२३
१९
“ ‘स्त्री ॠतुमती असताना तिच्या अशुद्धतेत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायला जाऊ नको.
२०
“ ‘तू आपल्या शेजार्याच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेऊ नकोस आणि स्वतःला भ्रष्ट करू नकोस.
२१
“ ‘तू आपल्या संतानांपैकी कोणालाही मोलख दैवतासाठी यज्ञबली म्हणून अर्पण करू नये, कारण असा यज्ञ केल्याने तुझ्या परमेश्वराच्या नावाचा अनादर होतो. मी याहवेह आहे.
२२
“ ‘स्त्रीप्रमाणे पुरुषाने पुरुषाशी शारीरिक संबंध ठेऊ नये. ते ओंगळ कृत्य आहे.
२३
“ ‘प्राण्याशी लैंगिक संबंध ठेवू नकोस आणि त्याद्वारे स्वतःला अशुद्ध करू नको. स्त्रीने प्राण्याशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी स्वतःला सादर करू नये; ती एक विकृती आहे.
Settings