Skip to content
लेवीय १८:२१-२८

लेवीय १८:२१-२८

२१
“ ‘तू आपल्या संतानांपैकी कोणालाही मोलख दैवतासाठी यज्ञबली म्हणून अर्पण करू नये, कारण असा यज्ञ केल्याने तुझ्या परमेश्वराच्या नावाचा अनादर होतो. मी याहवेह आहे.
२२
“ ‘स्त्रीप्रमाणे पुरुषाने पुरुषाशी शारीरिक संबंध ठेऊ नये. ते ओंगळ कृत्य आहे.
२३
“ ‘प्राण्याशी लैंगिक संबंध ठेवू नकोस आणि त्याद्वारे स्वतःला अशुद्ध करू नको. स्त्रीने प्राण्याशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी स्वतःला सादर करू नये; ती एक विकृती आहे.
२४
“ ‘अशा प्रकारच्या कोणत्याही अमंगळ गोष्टी करून तुम्ही स्वतःला अपवित्र करून घेऊ नये, कारण ज्या राष्ट्रात मी तुम्हाला पाठवित आहे, ती राष्ट्रे या गोष्टींनी भ्रष्ट झाली आहेत.
२५
भूमीसुद्धा भ्रष्ट झाली होती; म्हणून तिच्या पापाबद्दल मी तिला शिक्षा केली आहे, भूमीने तेथील रहिवाशांना देशाबाहेर ओकारीसारखे फेकून दिले आहे.
२६
म्हणून तुम्ही माझे नियम व विधी पाळा आणि वर उल्लेख केलेल्या कोणत्याही ओंगळ गोष्टी करू नका. हे नियम इस्राएली लोकांना व तुमच्यात राहत असलेल्या विदेशी लोकांनाही लागू आहेत,
२७
ज्या देशात मी तुम्हाला घेऊन जात आहे, त्या देशातील रहिवाशांनी अशा ओंगळ गोष्टी सतत केल्या म्हणून तो देश भ्रष्ट झाला.
२८
जर तुम्ही ही भूमी भ्रष्ट कराल, तर ती तुम्हाला ओकून टाकेल, जसे तुमच्या पूर्वी असलेल्या राष्ट्रांना तिने ओकून टाकले होते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options