- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
लेवीय १६:१-७
१
अहरोनाचे दोन पुत्र याहवेहच्या समक्षतेत गेल्यामुळे मरण पावल्यानंतर याहवेह मोशेबरोबर बोलले.
२
याहवेह मोशेला म्हणाले, “तुझा भाऊ अहरोन याला सांग की कोश व प्रायश्चिताचे झाकण असलेल्या पडद्यामागील परमपवित्रस्थानात त्याची इच्छा होईल तेव्हा येऊ नये, नाही तर त्याला मरण येईल. कारण दयासनावरील ढगात मी प्रकट होत राहीन.
३
“अहरोन पवित्रस्थानात अशाप्रकारे प्रवेश करेल: त्याने पापार्पणासाठी एक गोर्हा व होमार्पणासाठी एक मेंढा अवश्य आणावा.
४
त्याने तागाचा पवित्र झगा घातला पाहिजे आणि त्याच्या शरीराभोवती तागाचे अंतर्वस्त्र घालावे; तागाच्या वस्त्राने आपली कंबर कसावी आणि तागाचा फेटा बांधावा. ही पवित्र वस्त्रे आहेत; म्हणून ती अंगावर घालण्यापूर्वी त्याने पाण्याने स्नान करावे.
५
मग इस्राएली समुदायाकडून पापार्पणासाठी दोन बोकडे व होमार्पणासाठी एक मेंढा घ्यावा.
६
“अहरोनाने स्वतःच्या पापार्पणाचा गोर्हा परमेश्वराला पहिल्याने अर्पण करून स्वतःसाठी व स्वतःच्या कुटुंबासाठी प्रायश्चित्त करावे.
७
मग त्याने सभामंडपाच्या दाराशी याहवेहपुढे ती दोन बोकडे आणावी.
Settings