Skip to content
लेवीय १४:१०-१८

लेवीय १४:१०-१८

१०
आठव्या दिवशी त्यांनी दोन निर्दोष कोकरे, एक वर्षांची निर्दोष मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेला एक एफाचा एकतृतीयांश भाग सपीठ आणि एक लोगभर तेल घेऊन यावे.
११
मग शुद्ध जाहीर करणार्‍या याजकाने शुद्ध होणार्‍या मनुष्यास सभामंडपाच्या दाराशी याहवेहसमोर उभे करावे.
१२
नंतर याजकाने एक कोकरू व एकतृतीयांश लीटर जैतुनाचे तेल दोषार्पण म्हणून वेदीपुढे ओवाळणीचे अर्पण म्हणून याहवेहसमोर ओवाळावे.
१३
पवित्रस्थानात ज्या ठिकाणी पापार्पणाच्या व होमार्पणाच्या बलींचा वध करतात, त्या ठिकाणी याजकाने कोकराला ठार मारावे. पापार्पणातील बलीप्रमाणेच या दोषार्पणातील बली याजकाच्या हक्काचा आहे. हे परमपवित्र होय.
१४
मग याजकाने या दोषबलीचे काही रक्त घ्यावे आणि शुद्ध होणार्‍या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे.
१५
मग याजकाने तेलाचा काही भाग घ्यावा आणि ते आपल्या डाव्या हाताच्या तळहातावर ओतावे,
१६
व याजकाने त्यात आपल्या उजव्या हाताची बोटे बुडवून ते याहवेहपुढे सात वेळा शिंपडावे.
१७
यानंतर तळहातावर शिल्लक राहिलेले तेल याजकाने शुद्ध होणार्‍या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या पायाच्या व उजव्या हाताच्या अंगठ्यावरील दोषबलीच्या रक्तावर लावावे.
१८
याजकाच्या तळहातावर शिल्लक राहिलेले सर्व तेल शुद्ध ठरविण्याच्या माणसाच्या मस्तकास लावावे. अशाप्रकारे याजकाने त्या माणसासाठी याहवेहपुढे प्रायश्चित्त करावे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options