मुख्य मजकुरावर जा
लेवीय १४:१-९

कुष्ठरोग्याच्या शुद्धीकरणाचा नियम

लेवीय १४:१-९
याहवेह मोशेला म्हणाले,
कोणत्याही रोगग्रस्त व्यक्तीला त्यांच्या शुद्धीकरणाच्या विधीसमयी, जेव्हा त्यांना याजकाकडे आणले जाते तेव्हा हे नियम आहेत:
याजकाने छावणीबाहेर जाऊन बरे झालेल्या कुष्ठरोग्यांस तपासून पाहावे. जर ते कुष्ठरोगी बरे झाले आहेत असे दिसून आले,
याजक आज्ञा करतील की दोन जिवंत शुद्ध पक्षी आणि काही गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाची दोरी आणि एजोब त्या व्यक्तीच्या शुद्धीकरणासाठी आणाव्यात.
मग याजकाने आज्ञा करावी की, वाहत्या पाण्यावर धरलेल्या मातीच्या पात्रात त्यापैकी एक पक्षी मारावा;
गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाची दोरी व एजोब घेऊन दुसर्‍या जिवंत पक्ष्यासह वाहत्या पाण्यावर मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात या सर्व वस्तू बुडवाव्यात.
मग याजकाने ते रक्त कुष्ठरोगातून मुक्त झालेल्या व्यक्तीवर सात वेळा शिंपडावे व तो शुद्ध झाला आहे, असे जाहीर करून त्या जिवंत पक्ष्याला उघड्या शेतात सोडून द्यावे.
मग शुद्ध करण्यात येणार्‍या मनुष्याने आपले कपडे धुवावेत, आपले मुंडण करावे व स्नान करावे; म्हणजे तो विधिनियमानुसार शुद्ध होईल. त्यानंतर त्याने छावणीत राहण्यासाठी परत यावे. तरी सात दिवसापर्यंत त्याने आपल्या तंबूबाहेरच राहावे.
सातव्या दिवशी त्याने आपले डोके, दाढी, भुवया व अंगावरील एकंदर सर्व केस मुंडवावे, आपले कपडे धुवावे व पाण्याने स्नान करावे. मग तो शुद्ध होईल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options