Skip to content
लेवीय ११:१-९

लेवीय ११:१-९

याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले,
“इस्राएली लोकांना सांग: पृथ्वीवर राहणार्‍या सर्व प्राण्यांपैकी हे प्राणी तुम्ही खाऊ शकता.
ज्यांचे खूर दुभागलेले आहेत आणि जे प्राणी रवंथ करतात असे कोणतेही प्राणी तुम्ही खाऊ शकता.
“जे प्राणी फक्त रवंथ करतात किंवा त्यांचे फक्त खूर दुभागलेले आहेत, ते तुम्ही खाऊ नयेत. उंट जरी रवंथ करतात तरी त्यांचे खूर दुभागलेले नसतात; ते तुमच्यासाठी अशुद्ध आहेत.
रानससा जरी रवंथ करतो तरी त्याचे खूर दुभागलेले नसतात. तो तुमच्यासाठी अशुद्ध आहे.
ससा जरी रवंथ करतो, तरी त्याचे खूर दुभागलेले नसतात; तो तुमच्यासाठी अशुद्ध आहे.
डुकरे देखील अशुद्ध आहेत; जरी त्यांचे दुभागलेले खूर आहेत, तरी ते रवंथ करीत नाहीत.
त्यांचे मांस तुम्ही खाऊ नये किंवा त्यांच्या मृतशरीरांना स्पर्श करू नये; ते तुमच्यासाठी अशुद्ध आहेत.
“समुद्राच्या आणि नद्यांच्या पाण्यात राहणार्‍या सर्व प्राण्यांपैकी तुम्ही कल्ले आणि खवले असलेले कोणतेही प्राणी खाऊ शकता.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options