- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
नादाब आणि अबीहू यांचा मृत्यू
लेवीय १०:१-७
१
अहरोनाचे पुत्र नादाब व अबीहू यांनी आपआपल्या धुपाटण्यात अग्नी भरून, त्यावर धूप ठेवून तो अनाधिकृत अग्नी याहवेहसमोर नेला, जे याहवेहच्या आज्ञेविरुद्ध होते.
२
म्हणून याहवेहकडून अग्नी निघाला आणि त्याने त्यांना भस्म केले आणि ते याहवेहसमोर मरण पावले.
३
तेव्हा मोशे अहरोनास म्हणाला, “याहवेहने जे सांगितले ते असे: “ ‘जे माझ्याजवळ येतात त्यांना मी दाखवेन की मी पवित्र आहे; सर्व लोकांसमक्ष माझे गौरव होईल.’ ” यावर अहरोन शांत राहिला.
४
मग मोशेने अहरोनाचा चुलता उज्जीएलाचे पुत्र मिशाएल व एलसाफान यांना बोलावून सांगितले, “तुम्ही इकडे या आणि पवित्र स्थानासमोरील तुमच्या भावांची शरीरे उचलून छावणीबाहेर न्या.”
५
तेव्हा मोशेने आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी जाऊन ती उचलली आणि त्यांच्या अंगरख्यांसह ती बाहेर नेली.
६
मग मोशे अहरोन व त्याचे पुत्र एलअज़ार व इथामार यांना म्हणाला, “तुमचे केस न विंचरलेले असे मोकळे सोडू नका व तुमची वस्त्रे कधी फाडू नका, नाहीतर तुम्ही मराल आणि याहवेह तुम्हा सर्व समुदायावर रागावतील. परंतु तुमचे नातेवाईक, सर्व इस्राएली लोक याहवेहनी अग्नीने नाश केलेल्या लोकांबद्दल शोक करतील.
७
सभामंडपाचे प्रवेशद्वार सोडू नका, नाही तर तुम्ही मराल, कारण याहवेहच्या अभिषेकाचे तेल तुम्हावर आहे.” तेव्हा त्यांनी मोशेच्या आज्ञेप्रमाणे केले.
Settings