Skip to content
शास्ते ५:१६-२३

शास्ते ५:१६-२३

१६
मेंढ्यांच्या कळपांची शिट्टी ऐकण्यासाठी तू मेंढवाड्यात का राहिलास? रऊबेनच्या जिल्ह्यांमध्ये अंतःकरणाचा बारकाईने शोध घेतला गेला.
१७
गिलआद यार्देनेपलीकडे राहिला, पण दान आपल्या जहाजांपाशीच का राहिला? आशेर सागरकिनारीच राहिला आणि खाडीतील त्याच्या सुरक्षित स्थळी राहिला.
१८
जबुलूनच्या लोकांनी आपल्या जीव धोक्यात घातला; तसेच नफतालीच्या लोकांनी रणभूमीवर मरणाचा धोका पत्करला.
१९
“राजे आले, ते लढले, कनानाचे राजे लढले, मगिद्दोच्या झर्‍याजवळ तानख येथे लढले, त्यांनी चांदीची लूट घेतली नाही.
२०
आकाशातून तारे लढले, त्यांच्या मार्गावरून ते सिसेराशी लढले.
२१
किशोन नदीने त्यांना वाहून नेले, पुरातन नदी, किशोन नदी. कूच कर, माझ्या आत्म्या; समर्थ होऊन पुढे जा!
२२
घोड्यांच्या टापांचा गडगडाट झाला— घोडे चौखूर उधळले, त्याचे सशक्त घोडे चौखूर उधळले!
२३
याहवेहच्या दूताने आदेश दिला, ‘मेरोजला शाप द्या. त्याच्या लोकांना कडवटपणे शाप द्या, कारण ते याहवेहला मदत करावयाला आले नाहीत, पराक्रमी लोकांविरुद्ध याहवेहला मदत करावयाला आले नाहीत.’
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options