शास्ते ५:१३
आजूबाजूच्या संदर्भासह वचन १३ दाखवत आहे.
१०
“तुम्ही जे शुभ्र गाढवांवर स्वार होता, गालिचांच्या खोगिरावर बसता, आणि तुम्ही त्या मार्गाने पायी चालणारे, विचार करा,
११
गायकांचा आवाज पाणवठ्याच्या ठिकाणी. ते याहवेहचे विजयगीत गातात, इस्राएलच्या गावकर्यांच्या विजयाचे स्मरण करतात. “नंतर याहवेहचे लोक शहराच्या द्वाराजवळ गेले.
१२
‘दबोरा जागी हो, जागी हो! जागी हो, जागी हो, तुझ्या मुखातून गीत भरभरून वाहो! ऊठ, हे बाराका! हे अबीनोअमाच्या पुत्रा, तू बंधनात टाकलेल्या बंदिवानांना घेऊन जा.’
१३
“राहिलेले सरदार खाली आले; याहवेहचे लोक बलवान लोकांविरुद्ध माझ्याकडे आले.
१४
ज्यांचे मूळ अमालेकामध्ये होते, ते काही लोक एफ्राईमामधून आले; बिन्यामीन तुम्हाला अनुसरण करणार्या लोकांसह होते. माखीराचे सरदारही आले, जबुलूनाचे दंडधारी सेनापतिसुद्धा आले.
१५
इस्साखारचे राजपुत्र दबोरा सोबत होते; होय, इस्साखार बाराक सोबत, रऊबेनच्या जिल्ह्यांमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली खोर्यामध्ये पाठविले अंतःकरणाचा बारकाईने शोध घेतला गेला.
१६
मेंढ्यांच्या कळपांची शिट्टी ऐकण्यासाठी तू मेंढवाड्यात का राहिलास? रऊबेनच्या जिल्ह्यांमध्ये अंतःकरणाचा बारकाईने शोध घेतला गेला.
Settings