Skip to content
शास्ते ४:४-७

शास्ते ४:४-७

त्या समयी लप्पिदोथाची पत्नी दबोरा एक संदेष्टी होती आणि ती इस्राएलचे नेतृत्व करत होती.
तिने एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रामा आणि बेथेलमध्ये दबोराच्या खजूराच्या झाडाखाली न्यायसभा चालविली आणि इस्राएली लोक त्यांच्यातील वादाचा निर्णय घेण्यासाठी तिच्याकडे येत असत.
तिने नफतालीच्या प्रदेशातील केदेश येथे राहणारा अबीनोअमाचा पुत्र बाराकास बोलावून आणले आणि ती त्याला म्हणाली, “याहवेह इस्राएलाचे परमेश्वर तुला आज्ञा देतात: ‘जा आणि तुझ्यासोबत नफताली आणि जबुलून वंशातील दहा हजार पुरुषांना सोबत घेऊन ताबोर पर्वताकडे कूच करून जा.
मी याबीनाच्या सैन्याचा सेनापती सिसेराला त्याच्या रथांसह आणि त्याच्या सैन्यासह किशोन नदीकडे नेईन आणि त्याला तुझ्या हाती देईन.’ ”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options