शास्ते ३:२६-३०
२६
ते तिथे वाट पाहत असता, एहूद पळून गेला. दगडी मूर्तीपलीकडे सेईराह येथे जाऊन पोहोचला.
२७
तो तिथे गेल्यावर त्याने एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रणशिंग फुंकले आणि इस्राएली लोक त्याच्यासोबत डोंगराळ प्रदेशातून उतरले आणि त्याने त्यांचे नेतृत्व केले.
२८
त्याने आदेश दिला, “माझ्यामागे या, कारण याहवेहने तुमचे शत्रू मोआबी लोक तुमच्या हाती दिले आहेत.” मग ते त्याच्या पाठोपाठ खाली गेले आणि त्यांनी मोआब देशाजवळचे यार्देनेचे उतार रोखून धरले आणि कोणासही पलीकडे जाऊ दिले नाही.
२९
त्यावेळी त्यांनी सुमारे दहा हजार मोआबी लोक मारले. हे सर्व धिप्पाड आणि बलवान पुरुष होते; त्यापैकी एकही सुटू शकला नाही.
३०
त्या दिवशी मोआबी लोक इस्राएली लोकांच्या अधीन आले आणि त्यानंतर देशाला ऐंशी वर्षे शांतता लाभली.
Settings