Skip to content
शास्ते ३:१५-२६

शास्ते ३:१५-२६

१५
इस्राएलांनी पुन्हा याहवेहचा धावा केला आणि त्यांनी त्यांना एक सोडविणारा—बिन्यामीन गेराचा पुत्र एहूद दिला, जो डाव्या हाताचा मनुष्य होता. इस्राएली लोकांनी त्याला मोआबाचा राजा एग्लोनकडे नजराणा देऊन पाठविले.
१६
आता एहूदाने दुधारी तलवार बनविली, जी अर्धा मीटर लांब होती, ती त्याने त्याच्या झग्याखाली उजव्या मांडीवर बांधली.
१७
त्याने मोआबच्या राजा एग्लोनाच्या समोर रसद सादर केली, जो खूप गलेलठ्ठ मनुष्य होता.
१८
एहूदाने रसद सादर केल्यानंतर, ज्यांनी ते वाहून नेले होते त्यांना त्यांच्या मार्गावर परत पाठविले.
१९
परंतु गिलगालजवळील दगडी मूर्तीजवळ पोहोचल्यावर तो स्वतः एग्लोनकडे परत गेला आणि म्हणाला, “महाराज, माझ्याकडे तुमच्यासाठी एक गुप्त संदेश आहे.” राजा आपल्या सेवकांना म्हणाला, “आम्हाला एकटे सोडा!” आणि ते सर्व निघून गेले.
२०
मग त्याच्या राजवाड्याच्या वरच्या खोलीत तो एकटाच बसला असताना एहूद त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, “तुमच्यासाठी माझ्याकडे परमेश्वराचा संदेश आहे.” राजा आसनावरून उठताच,
२१
एहूदाने आपला डावा हात पुढे झग्याखाली करून उजव्या मांडीवर बांधलेली तलवार उपसली आणि राजाच्या पोटात खोल खुपसली.
२२
पात्याबरोबर मूठही आत गेली आणि आतडी बाहेर पडली, एहूदाने ती तलवार बाहेर काढली नाही, तलवारीवर चरबी गोळा झाली होती.
२३
मग एहूद बाहेर ओसरीत गेला; त्याने त्याच्यामागे वरच्या खोलीचे दरवाजे बंद केले आणि त्यांना कुलूप लावले.
२४
तो गेल्यानंतर सेवक आले आणि त्यांना वरच्या खोलीचे दरवाजे कुलूप लावून बंद असल्याचे दिसले. ते म्हणाले, “महाराज राजवाड्याच्या आतील खोलीत आराम करण्यास गेले असावे.”
२५
ते लाजिरवाणे वाटेपर्यंत थांबले, परंतु जेव्हा त्यांनी खोलीचे दार उघडले नाही, तेव्हा त्यांनी किल्ली घेतली आणि दार उघडले. तिथे त्यांना आपला स्वामी जमिनीवर मरून पडलेला दिसला.
२६
ते तिथे वाट पाहत असता, एहूद पळून गेला. दगडी मूर्तीपलीकडे सेईराह येथे जाऊन पोहोचला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options