शास्ते १५:१-५
१
काही दिवसानंतर गहू कापण्याच्या हंगामात, शमशोनाने एक शेळी घेतली आणि आपल्या पत्नीला भेटायला गेला. तो म्हणाला, “मी माझ्या पत्नीच्या खोलीत जात आहे.” पण तिचे वडील त्याला आत जाऊ देईना.
२
“मला खात्री होती की तू तिचा तिरस्कार करतोस,” तो म्हणाला, “मी तिला तुझ्या सोबत्याला दिले. तिची धाकटी बहीण अधिक आकर्षक नाही का? तिच्याऐवजी हिला घेऊन जा.”
३
शमशोन त्यांना म्हणाला, “यावेळी मला पलिष्ट्यांवर चालून जाण्याचा अधिकार आहे; मी त्यांना शिक्षा करेन.”
४
म्हणून शमशोन बाहेर पडला आणि त्याने तीनशे कोल्हे पकडले आणि जोडीजोडीने त्यांच्या शेपट्या एकत्र बांधल्या. प्रत्येक दोन शेपट्यांच्या जोडीमध्ये त्याने एकएक मशाल बांधली,
५
मशाली पेटविल्या आणि कोल्ह्यांना पलिष्ट्यांच्या उभ्या पिकात मोकळे सोडले. त्यांनी द्राक्षमळे आणि जैतुनाचे मळे आणि धान्य जाळून टाकले.
Settings