मुख्य मजकुरावर जा
शास्ते १३:२-७

शमशोनाचा जन्म

शास्ते १३:२-७
दान कुळातील सोराह येथील एक मनुष्य होता, ज्याचे नाव मानोहा होते, त्याची पत्नी होती, जी वांझ असून ती लेकरांना जन्म देऊ शकत नव्हती.
याहवेहच्या दूताने तिला दर्शन दिले आणि म्हणाला, “तू वांझ आहे आणि तुला मूल नाही, तरीपण तू गर्भवती होशील आणि एका पुत्राला जन्म देशील.
तू द्राक्षारस किंवा मद्य घेऊ नकोस आणि अशुद्ध असलेले काहीही सेवन करू नकोस.
कारण तू गर्भवती होशील आणि पुत्राला जन्म देशील, गर्भावस्थेपासूनच तो परमेश्वराला समर्पित नाजीर होईल म्हणून त्याच्या केसाला वस्तऱ्याचा स्पर्श करू नकोस, कारण इस्राएलला पलिष्ट्यांच्या हातून सोडविण्यास तोच नेतृत्व करेल.”
तेव्हा ती स्त्री आपल्या पतीकडे गेली आणि त्याला सांगितले, “परमेश्वराचा एक पुरुष माझ्याकडे आला. तो परमेश्वराच्या दूतासारखा दिसत होता, अतिशय अद्भुत. तो कुठून आला होता हे मी त्याला विचारले नाही आणि त्याने आपले नावही मला सांगितले नाही.
परंतु त्याने मला सांगितले, ‘तू गर्भवती होशील आणि एक पुत्रास जन्म देशील. आतापासून द्राक्षारस किंवा मद्य घेऊ नको, अशुद्ध असे काहीही खाऊ नको, कारण ते बाळ, तो पुत्र गर्भावस्थेपासून त्याच्या मृत्यूपर्यंत परमेश्वराचा नाजीर होईल.’ ”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options