शास्ते १२:४-६
४
मग इफ्ताहाने गिलआदाच्या माणसांना एकत्र बोलाविले आणि एफ्राईमच्या विरुद्ध युद्ध केले. गिलआदाच्या माणसांनी एफ्राईमच्या लोकांना मारले, कारण ते म्हणाले होते, “तुम्ही गिलआदाचे लोक एफ्राईमातून व मनश्शेहतून पळपुटे आहात.”
५
गिलआदांनी एफ्राईमकडे जाणारे यार्देनेचे खोरे काबीज केले आणि जेव्हा एफ्राईममधील कोणी वाचला व म्हणाला, “मला ओलांडू दे,” तेव्हा गिलआदाचे लोक त्याला विचारीत, “तू एफ्राईमी आहेस का?” जर तो म्हणाला, “नाही,”
६
ते म्हणत, “ठीक आहे मग ‘शिब्बोलेथ म्हण.’ ” जर तो “सीब्बोलेथ,” म्हणाला, कारण तो ते शब्द नीट उच्चारू शकला नाही, तर ते त्याला धरत आणि त्याला यार्देनेच्या उतारावर ठार करीत. त्यावेळी एफ्राईमचे बेचाळीस हजार लोक ठार झाले.
Settings