यहोशुआ १०:२८-३२
२८
त्याच दिवशी यहोशुआने मक्केदा या शहराचा नाश केला आणि त्या शहराचा राजा व त्यातील प्रत्येकाचा तलवारीने संहार केला. एकही व्यक्ती जिवंत ठेवण्यात आली नाही. त्याने यरीहोच्या राजाचे केले तसेच मक्केदाच्या राजाचेही केले.
२९
नंतर यहोशुआ व त्याच्याबरोबर सर्व इस्राएली लोक मक्केदाहून लिब्नाह शहरावर चालून गेले आणि त्याच्यावर हल्ला केला.
३०
याहवेहने ते शहर आणि त्याच्या राजालाही इस्राएलच्या हाती दिले. ते शहर आणि त्यातील प्रत्येकाचा यहोशुआने तलवारीने नाश केला. त्याने कोणालाही जिवंत सोडले नाही आणि यरीहोच्या राजाचे जसे केले तसे त्याने तेथील राजांचे केले.
३१
मग यहोशुआसह संपूर्ण इस्राएल लिब्नाहहून लाखीशला गेले; ते त्या शहराशी युद्ध करण्यासाठी सज्ज झाले व त्यांच्यावर हल्ला केला.
३२
याहवेहने लाखीश शहर इस्राएलच्या हाती दिले आणि यहोशुआने दुसर्या दिवशी त्यांच्यावर ताबा मिळविला. लिब्नाहचा केला तसाच लाखीश शहर व त्यात असलेल्या सर्वांचा त्यांनी तलवारीने नाश केला.
Settings