योनाह १:४-१०
४
मग याहवेहने समुद्रावर एक प्रचंड वारा सोडला आणि इतके भयंकर वादळ उठले की जहाज फुटण्याचे भय उद्भवले.
५
सर्व खलाशी घाबरले आणि प्रत्येकजण आपआपल्या दैवतांचा धावा करू लागला. आणि जहाजाचा भार कमी व्हावा म्हणून त्यांनी जहाजात भरलेले साहित्य समुद्रात टाकण्यास सुरुवात केली. पण योनाह मात्र जहाजाच्या तळघरात अगदी गाढ झोपला होता.
६
तेव्हा जहाजाचा कप्तान खाली तळघरात त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, “अशा वेळी तू कसा झोपू शकतोस? चल, ऊठ आणि तुझ्या दैवताला हाक मार आणि ते आपल्याकडे लक्ष देतील व कृपा करतील म्हणजे आपला नाश होणार नाही.”
७
तेव्हा खलाशी एकमेकांना म्हणाले, “आपण चिठ्ठ्या टाकून कोणामुळे हे संकट आले आहे ते शोधू या.” मग त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या आणि योनाहच्या नावाने चिठ्ठी निघाली.
८
यावर त्यांनी योनाहला विचारले, “आम्हाला सांग, आमच्यावर हे संकट कोणामुळे आले आहे? तू काय काम करतो? तू कुठे राहतो? तुझा देश कोणता? तू कोणत्या लोकांपैकी आहेस?”
९
योनाहने त्यांना उत्तर दिले, “मी एक इब्री आहे आणि मी स्वर्गातील याहवेह परमेश्वराची उपासना करतो, ज्यांनी समुद्र आणि कोरडी जमीन निर्माण केली.”
१०
हे ऐकून ते घाबरले आणि योनाहला म्हणाले, “तू हे काय केलेस?” (कारण योनाहने त्यांना सांगितले होते की तो याहवेहच्या उपस्थितीतून पळून जात आहे.)
Settings